मावळात 127 ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा

मावळात 127 ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा

तळेगाव दाभाडे : तरुणाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार रुजावेत या उद्येशाने मावळ तालुक्यात एकाच वेळी 127 ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे यांनी एकाच वेळी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले होते.

तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, अभिषेक, भजन, ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक, व्याख्याने अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मावळ तालुक्यातील गावोगावी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्रामस्थ, महिला, तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news