पॅरिस मध्ये होत असलेल्या ‘विवाटेक’ मध्ये पुण्याच्या ‘वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजिला’समावेशाची संधी | पुढारी

पॅरिस मध्ये होत असलेल्या ‘विवाटेक’ मध्ये पुण्याच्या ‘वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजिला’समावेशाची संधी

पुणे,:- पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या ‘विवाटेक’ मध्ये भारताला ‘स्टार्टअप कंट्री ऑफ द इयर’ चा सन्मान मिळाला असून सॅटेलाईटवरुन आलेल्या डेटाचे ॲडव्हान्स मशिन लर्निंग आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने विश्लेषण करुन त्याआधारे जलद आणि अचूक डेटा निर्माण करणाऱ्या ‘वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजिला’ ‘विवाटेक’ मध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

15 ते 18 जून या काळात ही परिषद होणार असून यात भारताचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व देशाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव करतील. त्यांच्याबरोबर 100 हून अधिक अधिकारी असतील. ‘वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीज’ तर्फे त्यांच्या प्रमुख उत्पादन विकासक शर्वरी नागराज परिषदेत सहभागी होणार आहेत. अद्वैत कुलकर्णी, आदित्य टेकाळे आणि राजेंद्र मनोहर हे तीन संचालक या स्टार्टअपचे नेतृत्व करतील. परिषदेत अत्याधुनिक डिजिटल सोल्यूशन्स, स्थानिक ई-मोबिलिटी, ड्रोन्स, टिकाऊ तंत्रज्ञान तसेच एआय ॲप्लिकेशन्स किंवा कटिंग एज स्टार्टअपला देशातर्फे प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मॅपिंग करण्यासाठी उपग्रह, एरिअल प्लॅटफॉर्म, फील्ड सेन्सर यावरुन डेटा घेतला जातो. त्यानंतर त्याचे एआय वापरुन विश्लेषण वसुंधरा तयार करते. वसुंधराने विकसित केलेल्या अर्बन टेक्नॉलॉजीमधील नवकल्पना आणि उपायांचे सादरीकरण या परिषदेत होणार आहे. एखाद्या शहरात किती इमारती वाढल्या ? शहर कसे वाढले? शहरात झाडे किती, तेथील रस्ते किती ? यासह विविध प्रकारचे मॅपिंग या स्टार्टअपमुळे सोपे झाले आहे, अशी माहिती संचालक आदित्य टेकाळे यांनी दिली आहे.

Back to top button