Pune Crime: 'खूप त्रास होतोय…,' पोटात बाळ, डोळ्यांत भविष्याची स्वप्नं; पण हुंड्याच्या छळाने २३ वर्षाच्या महिलेने घेतला टोकाचा निर्णय

Pune Dowry Harassment Case: पुण्यातील उंड्री-वडाचीवाडी परिसरात २३ वर्षीय गर्भवती वैष्णवी जरांडे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
Pune Dowry Harassment Case
Pune Dowry Harassment CasePudhari
Published on: 
Updated on: 

Pune Dowry Harassment Case: पुण्यातील उंड्री परिसरातील वडाचीवाडी येथे २३ वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी प्रवीण जरांडे असे मृत महिलेचे नाव आहे. हुंड्यासाठी पाच लाख रुपये किंवा कार घेऊन देण्याची मागणी करत पतीसह सासू-सासऱ्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

वैष्णवीचा ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी विवाह झाला होता. लग्नावेळी वैष्णवीच्या कुटुंबीयांनी १० तोळे सोने आणि कंपनीची दुचाकी दिल्याचे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही सासरच्या मंडळींकडून आणखी हुंड्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, वैष्णवीकडे पाच लाख रुपये किंवा कार घेऊन देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीवरून तिचा पती, सासू आणि सासरे तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Pune Dowry Harassment Case
CJP Protest Mumbai: शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनाला ब्रेक; मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली? सांगितली ४ महत्त्वाची कारणं

दरम्यान, २४ सप्टेंबरच्या रात्री वैष्णवीने आपण सासरी त्रस्त असल्याचे सासूला फोनवर सांगितले होते. त्यानंतर तिच्या पतीने वैष्णवीच्या आईला फोन करून तिला घरी घेऊन जाण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ सप्टेंबर रोजी सकाळी वैष्णवी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Pune Dowry Harassment Case
Bank Strike: ग्राहकांना मोठा दिलासा! 3 दिवसांचा बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे; बैठकीत नेमकं काय ठरलं? जाणून घ्या महत्त्वाचे निर्णय

वैष्णवीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून काळेपडळ पोलिसांनी पती ओंकार संजय घिसरे याच्यासह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंड्याच्या मागणीसाठी झालेल्या छळामुळेच वैष्णवीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news