पिंपरी : मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्यावतीने पुरूषांनी वाजत गाजत सात फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली. गेल्या सात वर्षांपासून संस्थेकडून असा उपक्रम राबविला जात आहे.
या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा मिना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.
विकास कुचेकर म्हणाले, की महिलांनी वटवृक्षाची फाद्यी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पूजा करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा पुढील पिढीला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळण्यासाठी वटवृक्षाची लागवड करून जतन करण्याचे त्यांनी आवाहन केले.