कोरोनामुळे शालेय साहित्य महागले | पुढारी

कोरोनामुळे शालेय साहित्य महागले

भोसरी : नवीन शैक्षणिक वर्ष बुधवार (दि. 15) पासून सुरू होत आहे. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर साहित्य खरेदी होत असल्याने बाजारात विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होत आहे. यंदा शालेय शुल्क 15 ते 20 टक्के तर शैक्षणिक साहित्याच्या किमतीत 25 ते 30 टक्क्यायांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Karanvir Bohra : फसवणूक करत महिलेला जीवे मारण्याची धमकी; प्रसिद्ध अभिनेत्यावर गुन्हा दाखल

कोरोनाच्या ब्रेकनंतर यंदा पहिल्या दिवसापासून नियमित शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली असलयाचे विक्रेते सांगत आहे. वह्यांच्या किमती डझनमागे मोठी वाढ झाली आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य एक हजार रुपयापर्यंत मिळत होते. यंदा त्यासाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे होती सवलत.

यवतमाळ : उमरखेडात टोळक्याचा तिघांवर प्राणघातक हल्ला

कोरोना काळात शाळा गेली दोन वर्षे बंद होत्या; पण काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवत शुल्क वसूल केले. शासन आदेशामुळे गेल्या वर्षी शिक्षण शुल्कात 15 टक्के सवलत देण्यात आली. यंदा शिक्षण शुल्कात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांना यंदा महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

साहित्याचे दर (रुपयात)
पेन 7 ते 25
वॉटर बॅग 45 ते 300
कंपास पेटी 45 ते 200
टिफिन बॉक्स 35 ते 250
स्कूल बॅग 250-500
वह्या (डझन) 250

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किमतीमुळे शैक्षणिक साहित्य यंदा महागले आहे
– सूर्यकांत चव्हाण, विक्रेते

Back to top button