

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची (ओबीसी) टक्केवारी जमा करण्याचे काम अखेर, मंगळवारी (दि.14) पूर्ण झाले. त्या संदर्भातील अहवाल राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात आला आहे. महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासहित व्हाव्यात म्हणून राज्य सरकार ओबीसींचा इम्पीरिकल डाटा गोळा करण्याचे काम हाती घेतले.
राज्याच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार पालिकेने ओबीसींच्या तोंडी सर्वेक्षणास 7 जूनला सुरुवात केली. पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीतील आडनावाच्या यादीनुसार ओबीसीचे सर्वेक्षण करण्यात आले. सोमवारी (दि.13) व मंगळवारी (दि.14) सर्व्हर सुरळीत झाल्याने 1 हजार 200 कर्मचार्यांकडून ओबीसी व नॉनओबीसी असे नोंदणीचे काम पूर्ण झाले. त्यातील त्रुटी दूर करून त्याचा अहवाल राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.