पिंपरी: जनसंवाद सभेत माजी नगरसेवकाने फेकल्या गोट्या | पुढारी

पिंपरी: जनसंवाद सभेत माजी नगरसेवकाने फेकल्या गोट्या

पिंपरी : महापालिकेचे अधिकारी काम करत नसल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आयोजित जनसंवाद सभेत शिवसेनेचे माजी नगरसेवक व शहरप्रमुख सचिन भोसले यांनी गोट्या फेकल्या तसेच गोट्यांची बरणी अधिकार्‍यांना भेट दिली. महापालिकेचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी विकासकामे मार्गी लावण्याचे आदेश बैठकीत दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आज झालेल्या सभेत माजी नगरसेवक भोसले यांनी प्रशासन कामे करत नसल्याचा आरोप करत सभेत गोट्या टाकल्या गोट्या खेळत बसा, असे ते म्हणाले यावेळी माजी विरोधी पक्षनेते कैलास बारणे हेही उपस्थित होते.

या सभेत नागरिकांनी गटारावरील व रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, अनधिकृत नळ जोडणी, अपुरा पाणीपुरवठा याबाबत तक्रारी केल्या. दीपक शेलार यांनी गटार, रस्त्यावरील अतिक्रमणे काढावेत अशी मागणी केली. थेरगाव येथील जालिंदर हिंगे यांनी ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची तर संजय गायखे यांनी काळेवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली थेरगावमधील सखाहरी पाठक यांनी केबलसाठी रस्ता खोदला आहे, मात्र तो बुजवला नसल्याचे निदर्शनास आणले.

युवराज दाखले यांनी तापकीर नगरमधील इंदिरा गांधी झोपडपट्टीतील वाचनालय पुन्हा सुरू करण्याची तर चंद्रकांत भोसले यांनी थेरगावमधील अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली. स्वराज्य कॉलनी येथील कैलास सानप यांनी पडपथ मोकळा करावा अनधिकृत नळजोडण्या काढाव्यात, अशी सूचना ी केली पडवळ नगर येथील लक्ष्मण भंडारे यांनी रस्त्याचे डांबरीकरण करावे पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी तर थेरगाव मधील संतोष मंडलिक यांनी उघडे नाले झाकण्याची मागणी केली लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी अशोका सोसायटी थेरगाव येथील ड्रेनेज लाईन बदलण्याची मागणी केली पानसरे नगर मधील शेख शौकत हमीद यांनी थेरगावमधील बीफ दुकाने बंद करण्याची तर कैलास नगर थेरगावमधील सिद्धार्थ साळवे यांनी पेविंग ब्लॉकची कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

रस्ते दुरुस्ती करा

सीसीटीव्ही केबलसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवावेत. रस्ता डांबरीकरणाचे कामे लवकर करावीत. पावसाळ्यापूर्वी ते काम पूर्ण करून रस्त्यांची चांगल्या प्रकारे दुरूस्ती करावी. रस्त्यातील राडारोडा उचलावा. वाहतुकीस अडथळा ठरणार्या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात. छाटलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा तत्काळ उचलण्यात यावा, अशी तक्रार सभेत अनेक नागरिकांनी केली.

Back to top button