पुणे : पुण्याच्या ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल; जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचे आदेश

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्बंध सोमवारपासून (दि.16) शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर हा पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. सर्व दुकाने, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या काही आठवड्यापासून 5 टक्क्यांपेक्षा कमी होत नव्हता. कोरोना निर्बंधातून सुट देण्यात आली नव्हती. मात्र, सध्या ग्रामीणचा कोरोना बाधितदर 4.9 टक्यांवर आल्याने निर्बंधातून सुट मिळाली आहे.

सर्व हॉटेल, बार 50 टक्के क्षमतेसह सर्व रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेलमध्ये रात्री 9 पर्यंत ऑर्डर घेता येणार आहे.

मॉल सुरू करण्यास परवानगी आहे, मात्र ग्राहक व स्टाफ यांनी दोन डोस घेतले पाहिजे. मॉल रात्री दहा पर्यंत सुरू दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल, दुकानांमधील सर्व कर्मचार्‍यांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवसांचा कालावधी झालेला असावा आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिम, योगासेंटर, सलून, स्पा, रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत.

विवाह सोहळ्यांसाठी खुल्या प्रांगणातील, बंदिस्त मंगल कार्यालयातील संबंधित ठिकाणाच्या आसन व्यवस्थेच्या पन्नास टक्के क्षमतेने व कोविड उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

खुल्या प्रांगणात क्षमतेच्या पन्नास टक्के जास्तीत जास्त दोनशे व्यक्तींना परवानगी तर बंदिस्त मंगल कार्यालयात पन्नास टक्के क्षमतेने जास्तीत जास्त शंभर व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तर चित्रपट गृहे बंद, धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत.

इनडोअर व आऊटडोअर क्रीडाप्रकार सुरु राहणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news