बीआरटी मार्गात गस्त वाढवण्याची मागणी | पुढारी

बीआरटी मार्गात गस्त वाढवण्याची मागणी

पिंपरी : काळेवाडी बीआरटी मार्गात पहाटे 5 ते सकाळी 7 दरम्यान पोलिस गस्त वाढवण्याची मागणी प्रहारचे संजय गायखे यांनी केली आहे. यासंदर्भात वाकड पोलिस ठाण्यासचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की काळेवाडी बीआरटी मार्गात महिला मॉर्निग वॉककरिता पहाटे 5 ते सकाळी 7 या वेळेत येत असतात. त्या ठिकाणी काही तरुण चोरीच्या व छेडछाडीच्या उद्देशाने दुचाकी वाहनांवर ट्रीपल शिट येवून गळ्यातले दागिणे ओढतात. तसेच, महिलांशी छेडछाड  करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीआरटी मार्गात पोलिसांनी सिव्हील ड्रेसवर गस्त घालावी.

Back to top button