वरवे येथील पुलाची उंची कमी अडचणीची, सातारा महामार्गावर अडकले ट्रेलर

वरवे येथील पुलाची उंची कमी अडचणीची, सातारा महामार्गावर अडकले ट्रेलर
Published on
Updated on

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा:  पुणे-सातारा महामार्गावरील वरवे (ता. भोर) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी लोखंडी पुलाची उंची कमी पडल्याने औद्योगिक वसाहतीमधून मोठे जॉब वाहतूक करणारे ट्रेलर अडकत आहेत. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.
वरवे येथील .

मुंबईकडे सायलो टँक घेऊन जाणारे दोन ट्रेलर कमी उंचीमुळे पुलाखालून पास होण्यात अडसर निर्माण झाला. ट्रकचालकांनी टायरमधील हवा कमी करूनदेखील ट्रेलर पुलाखालून गेला नाही. दोन्ही ट्रेलर रविवारी (दि. 12) मध्यरात्रीपासून अडकले आहेत. याबाबत महामार्ग प्राधिकरण प्रशासन ठोस पर्याय काढत नसल्याने चालकांचे हाल होत आहेत.

शिरवळ, खंडाळा, वाई या भागांत एमआयडीसी असल्याने तेथील औद्योगिक वसाहतीमध्ये विविध जॉब तयार केले जातात. मुंबई बंदराकडे ते जॉब घेऊन जाणार्‍या वाहनांची वर्दळ महामार्गावर असते. टोलनाक्याच्या उंचीप्रमाणे वरवे येथील पादचारी पूल न बनविल्याने अनेकदा अशी वाहने अडकून पडतात.

हा पूल किमान 20 फूट उंचीचा असणे गरजेचे असताना एनएचआयने साडेपाच मीटर उंचीचा पूल उभारल्याने वाहने अडकत असल्याचा आरोप सांगली येथील वाहनमालक विश्वास सातपुते यांनी केला.

मोठे जॉब म्हणजे काय?
पवनचक्कीच्या पाती, विमानाचे जॉब, केमिकल टाक्या, कंपनीमध्ये गॅस साठविण्यासाठी लागणार्‍या टाक्या, बॉयलर, रेल्वेचे डबे आदी.

महामार्गाच्या निकषाप्रमाणे वरवे येथील लोखंडी पूल साडेपाच मीटर उंचीवर उभारला आहे. वाहनचालकांनी ओव्हरलोड केल्यामुळे अशा अडचणी निर्माण होऊ शकतात.
– संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचआय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news