पिंपरी : लिंकरोड येथील खोदकामांची मालिका कधी संपणार?

पिंपरी : लिंकरोड येथील खोदकामांची मालिका कधी संपणार?

पिंपरी : लिंक रोड येथील दुर्गा कॉर्नर चौकात नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्याचे व पदपथाचे पुन्हा खोदकाम करण्यात आले आहे. याठिकाणी होणार्‍या सततच्या खोदकामामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच, ही खोदकामांची मालिका कधी संपणार? असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.

चिंचवडगावात गेल्यावर्षी मेट्रोच्या पॉवर स्टेशनसाठी संपूर्ण परिसरातील रस्त्याच्याकडेला खोदकाम केले होते. जवळपास एक वर्षभर नागरिकांनी उखडलेले रस्ते आणि पदपथ यांचा त्रास सहन केला. यानंतर यावर्षी नुकतेच कुठे अर्बन स्ट्रिट डिझाईनचे पदपथ आणि स्पीड ब्रेकर विकसित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना थोडा कुठे दिलासा मिळाला.

सध्या ड्रेनेज लाईनसाठी पूर्ण देवधर सोसायटी खोदण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या रहिवाशांना चालणे, गाडी पार्क करणे अवघड झाले आहे. तसेच, याठिकाणाहून शॉर्टकट म्हणून पिंपरी आणि चिंचवडगावातही जाता येते. रस्ता खोदल्यामुळे नागरिकांना एल्प्रो कंपनीपासून वळसा मारून यावे लागते. दुर्गा कॉर्नर याठिकाणी जवळपास पाच ते सहा वेळा खोदकाम केले गेले आहे. एखादे खोदकाम केल्यानंतर त्याची दुरुस्ती केल्यानंतर परत काही दिवसांनी नवीन कामासाठी दुरुस्ती केलेला रस्ता खोदला जातो. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news