दापोडीतील काटे चाळीत चिखलमय रस्ता | पुढारी

दापोडीतील काटे चाळीत चिखलमय रस्ता

दापोडी : येथील काळुराम काटे चाळ येथे ड्रेनेज लाईन विभागाचे काम गेल्या पंधरा दिवस सुरू आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना चिखलात ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. स्थानिक रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत कार्यकारी अभियंता शिंदे यांनी सांगितले, की काळुराम काटे चाळ येथील काम अर्धवट स्थितीत आहे. काम अपूर्ण राहिल्यामुळे व पावसाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिक जिल्ह्याने देशाला दिले तीन लष्करी अधिकारी

नागरिकांना सद्यस्थितीत या रस्त्यावरून चालणे जिकिरीचे बनले आहे. रस्त्यावर चिखल व राडारोडा पसरल्याने ये-जा करणे कठीण बनले आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन असो किंवा ओढे-नाले असो यांची कामे परिपूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यामुळेच नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिसरातील कामे लवकरात लवकर करण्याची मागणी मैत्री संस्थेचे रवींद्र कांबळे व दीपक साळवे यांनी केली आहे.

Back to top button