वाहनतळाच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरी; दर वर्षी महापालिकेला मिळणार अडीच कोटी उत्पन्न | पुढारी

वाहनतळाच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरी; दर वर्षी महापालिकेला मिळणार अडीच कोटी उत्पन्न

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरातील महापालिकेच्या विविध 7 वाहनतळ तीन वर्षे चालविण्यासाठी काढलेल्या निविदांना महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. यामुळे महापालिकेला दर वर्षी अडीच कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे.

महापालिकेने शहरात विविध भागांत वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनतळे विकसित केली आहेत. ही वाहनतळे ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ च्या धर्तीवर खासगी संस्था किंवा व्यक्तींना चालविण्यास दिली जातात. प्रशासनाने शहरातील सात पार्किंगच्या निविदा मागविल्या होत्या. जवळपास सर्वच निविदा अधिक दराने आल्या होत्या. सर्वाधिक दर देणार्‍या ठेकेदारांच्या निविदांना मंजूर करण्यात आल्या.

विद्यार्थी घेणार मोकळा श्वास; मास्कसक्ती नाही, शिक्षकांचे दोन्ही डोस पूर्ण

यामध्ये पुणे स्टेशन येथील कै. तुकारामशेठ शिंदे वाहनतळ येथील दुचाकी आणि चार चाकी वाहनतळाची स्वतंत्र निविदा मागविण्यात आली होती. दुचाकीसाठीची 1 कोटी 8 लाख रुपयांची मे. शारदा सर्व्हिसेसची निविदा मंजूर करण्यात आली. तर, चारचाकी वाहनतळाची मे. डी. आर. सर्व्हिसेस या संस्थेची 81 लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली.

गणेश पेठेतील अल्पना सिनेमासमोरील वाहनतळाची 4 लाख 10 हजार रुपयांची अमित एन्टरप्रायजेसची, तर नारायण पेठेतील वाहनतळासाठीची कविता रामचंद्र मोरे यांची 6 लाख 4 हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. शुक्रवार पेठेतील भाऊ महाराज बोळातील पार्किंगची हिमाचल वेअर हौसिंग प्रा.लि.ची 1 लाख 80 हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली.

फर्ग्युसन रस्त्यावरील मिलेनियम प्लाझा येथील 25 लाख 15 हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. तर, जंगली महाराज रस्त्यावरील पार्किंगसाठी पीबीपी ग्रुपने भरलेली 22 लाख 52 हजार 855 रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

हेही वाचा

योद्ध्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुण्यात खा.धनंजय महाडीक टिळक, जगतापांना भेटले

दीडशेंवर नागरिकांची हृदयरोग तपासणी; आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

20 वर्षांत एकही चित्रपट करता आला नाही; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची खंत

Back to top button