राष्ट्रवादीचा वर्धापन दिन उत्साहात; विविध उपक्रमांचे आयोजन | पुढारी

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन उत्साहात; विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे सकाळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, जयदेव गायकवाड, भगवानराव साळुंखे, अंकुश काकडे, दीपाली धुमाऴ, प्रदीप देशमुख यांच्याह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रम या पक्षाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहराध्यक्ष जगताप यांच्यासह उपस्थित 507 जणांनी फॉर्म भरून मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. शहर उपाध्यक्षा डॉ. सुनीता मोरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. पक्षाच्या वतीने अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपतीची महाआरती करण्यात आली.
शहरात विविध ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Back to top button