आचार्‍यांना अच्छे दिन ! कोरोना काळानंतर मागणी वाढली तर हॉटेल व्यवसाय अडचणीत | पुढारी

आचार्‍यांना अच्छे दिन ! कोरोना काळानंतर मागणी वाढली तर हॉटेल व्यवसाय अडचणीत

कोरोना टाळेबंदीमध्ये व्यवसायांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. हॉटेल व्यवसायालादेखील मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. हॉटेल व्यवसाय बंद असल्याने अनेक कर्मचारी काम सोडून गावाकडे निघून गेले. अनेक मोठ्या हॉटेलमधील आचारी आणि कर्मचारी काम सोडून गेल्याने निर्बंध हटवल्यानंतर हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू झाली. पण आता मनुष्यबळ अपुरे पडत आहे.

आचार्‍यांना मागणी

हॉटेल व्यवसायात आचारी सर्वात महत्वाचा घटक असतो. शहरात अनेक हॉटेल बंद पडली होती. परंतु बंद पडलेल्या हॉटेलच्या ठिकाणी पुन्हा नव्याने हॉटेल सुरू झाली आहेत. हॉटेलमधील आचारी बदलले असल्याने ग्राहकांना पूर्वीची चव मिळत नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. तर सुट्टीच्या दिवशी किंवा आठवड्याच्या अखेरी ग्राहकांची हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यावेळेस व्यावसायिकांना कमी आचार्‍यांमध्ये काम भागवावे लागत आहे.

इतर कर्मचार्‍यांची वानवा
अनेकांनी टाळेबंदी आणि निर्बंध हटविल्यानंतर पुन्हा हॉटेल व्यवसाय सुरू केला. परंतु सध्या हॉटेलमध्ये वाढपी, इतर कर्मचार्‍यांची वानवा निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑर्डर दिल्यानंतर वाट बघावी लागत आहे. अपुरे मनुष्यबळ असताना हॉटेल मालकांना व्यवसाय करावा लागत आहे.

शहरात अनेक हॉटेल अद्यापही बंदच आहेत. तसेच सध्या वाढपी, आचारी यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जे आधीचे कर्मचारी दुसरीकडे काम करत आहेत. ते पुन्हा कामावर येण्यास तयार नाहीत.
-हॉटेल व्यावसायिक, पिंपरी

 

Back to top button