

तळवडे, पुढारी वृत्तसेवा: चिखली ते सोनवणे वस्ती रस्त्याच्या दूरावस्थेचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध करताच प्रशासनाने या रस्त्याच्या दुरूस्तीला सुरुवात केली आहे. चिखली ते सोनवणे वस्ती रस्त्यावर औद्योगिक वसाहतीमुळे सतत अवजड वाहनांची वर्दळ चालू असते.
हा रस्ता अनेक दिवसांपासून खड्ड्यांमुळे खराब झाला होता. या कडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याची बाब लक्षात येताच दैनिक पुढारीने या विषयी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची गांभिर्याने दखल घेत या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
या रस्त्यावरून अवजड वाहनांसोबतच दुचाकीस्वार कामगारांची देखील रहदारी असते. अनेकदा दुचाकीसारखी वाहने घसरून अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. या आशयाचे वृत प्रसिद्ध करताच रस्त्याच्या दुरूस्तीला तत्काळ सुरुवात केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा