पिंपरी : पालखी सोहळ्यासाठी मुख्य समन्वय अधिकारीपदी ढाकणे | पुढारी

पिंपरी : पालखी सोहळ्यासाठी मुख्य समन्वय अधिकारीपदी ढाकणे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्याकरिता मुख्य समन्वक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांची नियुक्ती आयुक्त राजेश पाटील यांनी केली आहे.

शहरात 21 जूनला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे तर, 22 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखींचे आगमन होणार आहे. आकुर्डी येथे 21 जूनला संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आहे. पालखींचे आगमन व मुक्कामाच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी पालिका, पोलिस, महावितरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पालखी सोहळ्याचे प्रमुख प्रतिनिधी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, आळंदी नगरपरिषद यांच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली.

त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांची नियुक्ती केली आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजन व व्यवस्थापनामध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पालिकेच्या विविध विभागांच्या अधिकार्‍यांसमवेत समन्वय करावा लागणार आहे. वॉकी टॉकी, कंट्रोल रूमचा वापर करून जलदगतीने संपर्क साधला जाणार आहे.
सूक्ष्म नियोजनाच्या दृष्टीने इन्सिडंट कमांडर म्हणून अधिकार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

Back to top button