पिंपरी: स्मार्ट सिटीतील हॉकर्स झोन पॉलिसी आठ वर्षांपासून हवेत ! | पुढारी

पिंपरी: स्मार्ट सिटीतील हॉकर्स झोन पॉलिसी आठ वर्षांपासून हवेत !

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2014 ला हॉकर्स झोन पॉलिसी (फेरीवाला धोरण) राबविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यास आठ वर्षे होऊनही शहरात हॉकर्स झोन तयार करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे हातगाडी, पथारीवाले यांना स्मार्ट सिटीत आपले हक्काचे ठिकाण नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

फेरीवाल्याचे सर्वेक्षण करून त्यांना पालिकेच्या जागेत गाळे देण्याचा निर्णय पालिकेने सन 2014 ला घेतला. हॉकर्स झोनसाठी शहरातील 246 जागा निश्चित करण्यात आल्या. सर्वेक्षणात तब्बल 10 हजार फेरीवाल्यांची नोंद झाली. त्यातील 9 हजार 25 फेरीवाले पात्र ठरले. कागदपत्रे देणार्या सुमारे 5 हजार जणांना ओळखपत्रे देण्यात आली. उर्वरित 4 हजार जणांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. पुढे ती योजनाच बारगली.

दर पाच वर्षांनी फेरीवाल्याचे सर्वेक्षण करण्याचा नियम आहे. सन 2019ला सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली. फेरीवाल्याचे सर्वेक्षण करणे, पालिकेच्या जागेत गाळे बांधून तेथे त्यांचे पुनर्वसन करणे या कामाच्या निविदेस प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर केवळ 8 क्षेत्रीय कार्यालयानिहाय सर्वेक्षणाची निविदा काढण्यात आली. त्यासाठी एजन्सीही निवडण्यात आली. दोन वर्ष झाले तरी, ते काम सुरू झालेले नाही.

संजय पवार की महाडिक? : राज्यसभा निवडणुकीचा आज फैसला

आयुक्त राजेश पाटील यांची क्षेत्रीय अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत चौक, मंदिर, शाळा, भाजी मंडई तसेच, वाहतुकीस अडथळा ठरणार्या जागा सोडून इतर ठिकाणी हॉकर्स झोनसाठी जागा निवडून त्यांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले. मात्र, ते काम संथ गतीने सुरू आहे. जागा निश्चित झाल्यानंतर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लालफितीच्या या कारभारामुळे स्मार्ट सिटीत अद्याप हॉकर्स झोनच तयार झालेले नाहीत.

जागा निश्चित झाल्यानंतर फेरीवाल्यांचे सर्वेक्षण : आयुक्त

सर्वेक्षण झाल्यानंतर फेरीवाले सध्या आहे त्या जागेवर आपला हक्क सांगतात. त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होतात. जोपर्यंत हॉकर्स झोनच्या जागा निश्चित होत नाहीत. तोपर्यंत सर्वेक्षण सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. योजना अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवा; केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची सूचना

शहर विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेण्याच्या निव्वळ गप्पा

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पिंपरी-चिंचवड शहराचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करणार असा, दावा आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे. दररोज हातगाडी, पथारीवाले, टपर्या अशा सर्वसामान्य विक्रेत्यांवर सरसकट कारवाई सुरू आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरात हॉकर्स झोन तयार झालेले नाहीत. हक्काची जागा नसल्याने फेरीवाले जागा मिळेल तेथे व्यवसाय करतात. मात्र, प्रशासन कारवाई करत असल्याने फेरीवाल्यांचा रोष वाढत आहे.

हॉकर्स झोन सोडून खाऊ गल्लीवर लक्ष

हॉकर्स झोनचा मुद्दा बाजूला ठेऊन प्रशासनाने इंदूर पॅटर्ननुसार खाऊ गल्ली सुरू करण्यास अधिक प्राधान्य देत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरील वर्दळीच्या रस्त्यावर खाऊ गल्ली सुरू झाली आहे. खराळवाडीतून पिंपरी कॅम्पाकडे जाणार्या भुयारी मार्गाजवळ खाऊ गल्ली आहे. गल्लीबोळात चाईनीज सेंटर व चौपाट्या सुरू आहेत. पालिकेतर्फे आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ व लांडेवाडी, भोसरीत खाऊ गल्ली तयार केली जाणार आहे.

Back to top button