पुणे : खूनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा खुनी हल्ला | पुढारी

पुणे : खूनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा खुनी हल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खूनाचा बदला घेण्यासाठी गुंडाच्या टोळक्याने तरुणावर लोखंडी कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी श्रीकांत जगन्नाथ गायकवाड (वय 32, रा. अष्टविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश मोहन कांबळे, नुण्या शेख, राहुल पुटगे व इतर साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व जण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पोलिसांनी राहुल पुटगे याला अटक केली आहे.

महाविकास आघाडीला धक्का! नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बश्या ऊर्फ बसवराज जयभीम कांबळे (वय 28, रा. अष्टविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी, मुळ रा. कर्नाटक) हा आपल्या आईला कामाला सोडायला गेला होता. परत येताना पूर्ववैमनस्यातून गंगानगर येथील स्मशान भूमीजवळ अमोल शिंदे व त्यांच्या साथीदारांनी खून केला होता. ही घटना 26 मे 2020 रोजी घडली होती.

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

बसवराज कांबळे याचा आतेभाऊ आकाश कांबळे (वय 22, रा. गुरुदत्त कॉलनी, फुरसुंगी) हा तेव्हापासून फिर्यादीकडे खुन्नसने बघत असायचा. बसवराज याचा खून करणार्या मुलांमध्ये फिर्यादी यांचाही सहभाग आहे, असे त्याला वाटत होते. त्यातून फिर्यादी हे 7 मे रोजी दुपारी साडेबारा वाजता दुचाकीवरून कामाचे बील आणण्यासाठी जात असताना आकाश याने कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार करून त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा खून केला. आकाश याने हातामधील कोयता हवेमध्ये भिरकावून मी इथला भाई आहे. कोणी मध्ये आले तर त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button