राहुरी : राहुरीत मंगळवारी झालेल्या कांदा लिलावावेळी शेतकर्यांनी 24 हजार 121 कांदा गोण्यांची आवक आणली. व्यापार्यांच्या सर्वोच्च बोलीमध्ये 1 हजार 410 रुपयांनी कांद्याचा दर वधारला. वांबोरी बाजारपेठेमध्ये बाजारीला 2 हजार 501 रुपये, गहू 2 हजार 200, सोयाबीन 6 हजार 155, भुईमूग 5 हजार इतके सर्वोच्च दरापर्यंत खरेदी झाला.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथम दर्जाच्या कांद्याला 901 ते 1 हजार 400 रुपयांपर्यंत दर लाभला. द्वितीय दर्जाच्या कांद्याला 501 ते 900 रूपये दर लाभला. तृतीय दर्जाच्या कांद्याला 100 ते 500 रुपये असा दर मिळाला. गोल्टी कांद्याला 400 ते 1 हजार रूपये असा दर देण्यात आल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.
https://youtu.be/IYYU1mogoqk