पुणे : ‘सीआयएसएफ’मध्ये दोघांची आत्महत्या | पुढारी

पुणे : ‘सीआयएसएफ’मध्ये दोघांची आत्महत्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) काम करणार्‍या महिला कर्मचार्‍याने आत्महत्या केल्यानंतर दोन तासांतच आणखी एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सिआयएसएफच्या वसाहतीततच दोन वेगवेगळ्या खोलीत त्यांनी आत्महत्त्या केल्याचे पोलिसांनीसांगितले.

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

अस्मिता दास (30) संजय कुमार (30) ही आत्महत्या केलेल्या दोघांची नावे रात्री उशीरा कळली. ही घटना विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सीआयएसएफच्या क्वार्टरमध्ये घडल्याचे परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीला धक्का! नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

या दोघांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्त्या केली हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, लोहगाव विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘सीआयएसएफ‘ कडे असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्यात येत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दली असून, पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.

Back to top button