पिपरी: आदर्श कॉलेज, जैन कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के | पुढारी

पिपरी: आदर्श कॉलेज, जैन कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत तळेगाव दाभाडे परिसरामधील इयत्ता बारावीच्या निकालामध्ये आदर्श ज्युनिअर कॉलेज व जैन ज्युनिअर कॉलेजने विज्ञान शाखेत निकाल 100 टक्के लागला आहे.
इंद्रायणी ज्युनिअर कॉलेजमधील विज्ञान शाखेमध्ये तेजश्रीराजे हनुमंत पानसकर हिने 90.83 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. तर शिवानी सुनील वाघमारे हिने 90.50 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.

वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक रिया राजेंद्र भेगडे हिने 90 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक तर सुनार तिलक भगतबहादूरने 89 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकाविला. कला शाखेत श्यामल संदीप मोधवे हिने (81.67 टक्के) प्रथम क्रमांक, रिया तात्याबा बाजारे हिने (79.17) द्वितीय क्रमांक पटकाविला. जैन जुनिअर कॉलेजमध्ये विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये देशमुख शौनक किरण याने (89) प्रथम क्रमांक, नातल साहिल सुनील (80.30) द्वितीय क्रमांक मिळविला.

नाशिकच्या विंचूर येथे पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला, १४ तोळे सोने लंपास

स्नेहवर्धक मंडळ ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखे मध्ये प्रथम क्रमांक शर्मा राज रामप्रताप (91.33), द्वितीय क्रमांक काळोखे ओम सूर्यकांत (82.50) याने मिळविला. तर, वाणिज्यमध्ये प्रथम क्रमांक शिंदे मुग्धा प्रकाश (91.50), द्वितीय क्रमांक जाधव अंकित देविदास (89.17) क्रमांक मिळविला. आदर्श ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक नेहा तेजस राधाकिसन (82.83), द्वितीय क्रमांक पाटील तेजस राजेंद्र (71.17) याने मिळविला आहे. कला शाखेत प्रथम क्रमांक चोरघे स्नेहा अंकुश (82.50), द्वितीय क्रमांक मुनोत श्रुती संजय (77.50) हिने मिळविला. मराठी माध्यम वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक शेटे गौरव संतोष (81)ए द्वितीय क्रमांक राक्षे समृद्धी संपत व गराडे वैभव सुरेश (78.17) मिळाला आहे.

इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक धुंद मोहिनी बाळासाहेब (87.50), द्वितीय क्रमांक गायकवाड ओमकार प्रभाकर (83) याने मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थांचे अध्यक्ष, संचालक, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Back to top button