

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी विभागाच्या पथकाच्यावतीने चर्होली व वाकड येथे सलग तिसर्या दिवशी 8 जून रोजी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
चर्होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथील 45 मीटर रस्ता रूंदीकरणास अडथळा ठरणार्या 20 पत्राशेड व बांधकामे आणि वाकड ते भुजबळ चौक बीआरटीएस रस्त्यावरील 62 पत्राशेड पाडण्यात आले. ही कारवाई 7 जून रोजी पोलिस बंदोबस्तात करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ई, ड आणि ब क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता संजय घुबे, कार्यकारी अभियंता सुनील भागवानी यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा