दिवसभर नोकरी करून मिळवले बारावीत यश | पुढारी

दिवसभर नोकरी करून मिळवले बारावीत यश

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘सकाळी नोकरी करून रात्री महाविद्यालयात जायचो. माझी आई एका ऑफिसमध्ये शिपाई म्हणून नोकरी करते. तिचा माझ्या शिक्षणाला पाठिंबा राहिला आहे. नोकरी करताना दिवसभर वेळ मिळायचा नाही म्हणून रात्री अभ्यास करायचो. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आंनद आहे. आता सीए करणार आहे,’ असं पूना नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी परशुराम पवार सांगत होता.

बारावीचा निकाल बुधवारी (दि.8) घोषित झाला. त्यात विविध रात्र-प्रशालेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनीही बाजी मारली आहे. दिवसभर नोकरी करून कष्ट करणार्‍या विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आहे. त्यातीलच एक म्हणजे परशुराम पवार…पूना नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेसाठी 79 विद्यार्थी बसले होते.

जखमी माकडीण उपचारासाठी स्वतःच पोहोचली दवाखान्यात

त्यात परशुराम पवार याने 79 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, तर आर्यन उत्तेकर याने 76.67 टक्के गुण मिळवून आणि अक्षदा चोरगे हिने 75.50 टक्के गुण मिळवून यश मिळविले आहे. प्रगती बेंडल हिने 71.83 टक्के आणि दीप्ती उपाध्ये हिने 69 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.

आबासाहेब अत्रे रात्र-प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेला 36 विद्यार्थी बसले होते. त्यातील 32 विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले आहे. महाविद्यालयाचा निकाल 88.88 टक्के लागला. कुरेशी सदफ सलीम याने 68.67 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी गरुड याने 67.67 टक्के, गणेश चव्हाण याने 66.33 टक्के, तर नागेश गवली याने 66.17 टक्के आणि करण कसबे याने 65.67 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.

Back to top button