पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने घातल थैमान | पुढारी

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने घातल थैमान

बारामती : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील अनेक भागांसह बारामती शहर आणि तालुक्याला 5 जून रोजी सायंकाळी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. वादळी वार्‍याने झाडे पडल्याने अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रचंड उन्हाने हैराण झालेल्या बारामतीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र, या पावसाने तालुक्याची दैना उडविली.

तालुक्यातील काही भागांत मात्र पावसाने हुलकावणी दिली. बारामती शहर, माळेगाव, पणदरे याशिवाय जिरायती भागालाही पावसाने झोडपून काढले. रविवारी जळगाव क. प. येथे 79 मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले होते.
बारामती शहरातील स्वीमिंग टँकशेजारी पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने रविवारी रात्री तेथे तळ्याचे स्वरूप आले होते.

नाशिक : जिल्ह्यात मान्सूनपूर्वने दिली ओढ, चालू महिन्यात केवळ 4 टक्के पर्जन्य

बारामती-निरा रस्त्यावर 15 फाट्याजवळ जुने झाड रस्त्यावरच कोसळले. निरा डावा कालव्यात अनेक झाडे उन्मळून पडली.
निरा-बारामती राज्यमार्गावर निरा डावा कालवा परिसरातील झाडे पडून रस्त्यावर आली होती. वडगाव निंबाळकर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली, तर महावितरणने तुटलेल्या तारा जोडून वीजपुरवठा सुरळीत केला.

सुपे परिसरात नुकसान

उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे 5 जून रात्री आठ वाजेनंतर वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वार्‍याचा जोर इतका होता की मोठी झाडे उन्मळून पडली, तर पिकांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाले. उंडवडी सुपे येथील शेतकरी सुमन किसन चांदगुडे यांच्या पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले.

रावणगाव परिसरात वादळी वारे

मान्सूनपूर्व पावसाने रावणगाव (ता. दौंड) परिसराला 5 जून रोजी सायंकाळी वादळी वार्‍यासह झोडपून काढले. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले, तारा तुटून पडल्या, जागोजागी वृक्ष उन्मळून पडले होते, तर महामार्गालगतच्या अनेक टपर्‍या उडाल्या. मळद, रावणगाव, नंदादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी वारा झाल्याने विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सोमेश्वरनगर परिसराला 5 जून रोजी सायंकाळी वादळी वार्‍याचा सामना करावा लागला. मात्र पावसाने हुलकावणी दिली.

हेही वाचा 

काच आहे; पण बघायचे काय; व्हिस्टाडोम कोचमधील प्रवाशांचा हिरमोड

नाशिक : कोविड सेंटरसाठी तयारी झाली सुरू; प्रशासन सतर्क

बीटकाॅईन गुन्हयात पाटील, घोडे विरोधात साडेचार हजार पानी दोषारोपत्र दाखल

 

Back to top button