बारामती, इंदापूरच्या दूध डेअरींची संगनमताने २१ लाखांची फसवणूक; चौघांविरोधात गुन्हा दाखल

crime
crime
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती एमआयडी व इंदापूरातील एका डेअरीची संगनमताने २० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन पठारे (रा. गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर), शरद महादेव गेजगे (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा), उमेश खुळपे (रा. घेर्डी, ता.सांगोला, जि. सोलापूर) आणि बंडू लेंडवे (रा. आंधळगाव, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोन्ही डेअरीकडून व्यवस्थापक सुशांत ज्ञानदेव शिर्के (रा. पाटस रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली.

२० ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. डेअरीमध्ये वनजकाटा ऑपरेटर म्हणून पवन पठारे हा काम करत होता. शरद गेजगे हा टॅंकर चालक तर खुळपे हे शिवांश दूध डेअरीचे मालक आणि बंडू लेंडवे हे अनिता लेंडवे दूध डेअरीचे मालक आहेत. २६ फेब्रुवारी रोजी फिर्यादीने रजिस्टरची पाहणी केली असता त्यात खाडाखोड झाल्याचे दिसून आले. त्यावरून त्यांनी पठारे याच्याकडे विचारणा केली असता त्याने लिहिताना चुकल्याने खाडाखोड झाल्याचे सांगितले.

धक्कादायक! भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे नग्न फोटो व्हाॅट्सअप स्टेटसला; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
.
परंतु त्याच्यावर संशय आल्याने फिर्यादीने संगणक साॅफ्टवेअर तपासले असता दूध टॅंकरच्या वजन काट्यात फेरफार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा पठारे याच्याकडे चौकशी केली असता त्याने गेजगे यांच्या ओळखीचे खुळपे, लेंडवे यांच्या डेअरीवरून येणाऱ्या दूधाच्या वजनात फेरफार करून आम्ही संगनमताने फसवणूक केल्याचे सांगितले. या घटनेत बारामती व इंदापूरमधील प्रमुख डेअऱ्यांची सुमारे २० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news