परराज्यातील मासळीवर पुणेकरांची मदार | पुढारी

परराज्यातील मासळीवर पुणेकरांची मदार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या किनारपट्टीवर मासेमारी बंदी लागू झाल्याने कोकणातील रत्नागिरी, मालवण, अलिबाग आणि मुंबई येथून होणारी मासळीची आवक बंद झाली आहे. सध्या, देशाच्या गुजरात, ओरिसा आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीवरून मासळी बाजारात येत आहे. त्यातुलनेत मागणी मोठी असल्याने मासळीच्या भावात वाढ झाली आहे.

मासेमारी बंदीमुळे बाजारातील खोल समुद्र व खाडीतील मासळीची आवक निम्म्यावर आली आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने त्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. बाजारात नदीच्या मासळीची आवकही चांगली असून त्याचे दर टिकून आहेत. चिकन, अंडी व मटणाचे दरही गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 5) खोल समुद्रातील मासळीची 5 टन, खाडी 100 किलो तर नदीच्या मासळीची 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची 10 ते 12 टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 2000-2400, मोठे : 1800-2000, मध्यम : 1200-1400, लहान : 800-900, भिला : 600-700, हलवा : 800-900, सुरमई : 1000-1400, रावस : 800-1000, घोळ : 800, करली : 400-480, भिंग : 360-400, पाला : 1200-1400, वाम : 900-1000, ओले बोंबील : 200-280. कोळंबी : लहान 280-360, मोठी : 480-600, जंबोप्रॉन्स : 1800,

किंगप्रॉन्स : 900-1000, लॉबस्टर : 2000, मोरी : 280-360, मांदेली : 140-160, राणीमासा : 320-400, खेकडे : 280-400, चिंबोर्या : 480-550. खाडीची मासळी : सौंदाळे : 320-400, तांबोशी : 550-600, बांगडा : 160-280, शेवटे : 360-400, तिसर्या : 240, खुबे : 100-200. नदीतील मासळी : रहू : 160, कतला : 160, मरळ : 400-480, शिवडा : 200-220, खवली : 200-220, आम्ळी : 100-160, खेकडे : 240-280, वाम : 500-600. मटण : बोकडाचे 660, बोलाईचे 660, खिमा 660, कलेजी 700. चिकन 250, लेगपीस 300, जिवंत कोंबडी 190, बोनलेस 350. अंडी : गावरान (शेकडा) 840, डझन 108, प्रतिनग 9. इंग्लिश (शेकडा) 520, डझन 72, प्रतिनग 6

Back to top button