

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यांवर प्राप्त हरकती, सूचनांची सध्या सुनावणी सुरू आहे. हिंजवडी विकसन केंद्रातील 23 गावांतील हरकतीधारकांच्या सुनावणीचा कार्यक्रम सोमवारपासून (6 जून) सुरू होणार आहे. आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात या हरकती, सूचनांवर सुनावणी होणार आहे.
हिंजवडी विकसन केंद्रामधील मुलखेड, घोटावडे, गोडांबेवाडी, भेगडेवाडी, मातेरेवाडी, भोईरवाडी, चांदे, म्हाळुगे, चांदखेड, माण, मारुजी, बेबडहोळ, हिंजवडी, गोटुबे, साळुबे, धमाणे, नेरे, दत्तवाडी, गहुंजे, जांबे, दारुखे, सांगवडे आणि शिरगाव या मफगावांमधून आराखड्यावर प्राप्त हरकती, सूचनांवर 6 ते 15 जून या कालावधीत सकाळी दहा ते दीड आणि दुपारी अडीच ते पाच या वेळेत आकुर्डी येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
पीएमआरडीएने 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर तब्बल 61 हजार हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. सुनावणीसाठी सात जणांची महानगर नियोजन समिती गठीत केली आहे. सूचना, हरकत सादर केलेल्या अर्जदारास सुनावणीबाबतचा सविस्तर तपशील टपालाद्वारे आणि लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आलेले आहे. याबाबतचा सविस्तर तपशील पीएमआरडीएच्या ुुु.िाीवर. र्सेीं.ळप या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या अर्जदारांस टपाल किंवा लघुसंदेशाद्वारे नोटिस प्राप्त झालेली नाही, अशा अर्जदारांनी हीच जाहीर नोटिस समजून पीएमआरडीएच्या संकेतस्थळावरील सुनावणीच्या सविस्तर तपशिलानुसार सुनावणीस हजर राहावे, असे आवाहन महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी केले आहे.