पाटस गटात राष्ट्रवादी-भाजपमध्येच लढत; इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग

पाटस गटात राष्ट्रवादी-भाजपमध्येच लढत; इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग
Published on
Updated on

अक्षय देवडे

पाटस : पाटस जिल्हा परिषद गटात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 हजारांच्या मतांचा पाटस-कुरकुंभ असा गट असताना यात पाटस-बिरोबावाडी असा एक गण होता, तर कुरकुंभ-जिरेगाव असा दुसरा गण होता. या गणात पांढरेवाडी, रोटी, वासुंदे, कुसेगाव, हिंगणीगाडी, पडवी, देऊळगावगाडा ही गावे होती. हा गट लोकांच्या खूप सोयीचा असल्याची चर्चा होत आहे. या गटात आमदार राहुल कुल गटाचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला होता.

असे असले तरी पाटस जिल्हा परिषद गटात कुल आणि थोरात यांचे कट्टर कार्यकर्ते असल्याने या गटातील खरी लढत राष्ट्रवादी व भाजप अशीच होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सध्याची जिल्हा परिषद गट रचना : खडकी-पाटस या गटात सुमारे 26 हजार मतदार आहेत. यामध्ये दोन पंचायत समितीचे गण आहेत. त्यात खडकी गणामध्ये मळद, रावणगाव, कौठडी, खडकी, स्वामी चिंचोली, नंदादेवी, जिरेगाव, खानोटा अशी गावे आहेत तर पाटस गणात बिरोबावाडी, कुरकुंभ, पांढरेवाडी, जिरेगाव, पाटस अशी गावे आहेत.

हा गट मोठा असून नागरिकांच्या सोयीचा नव्हता असे नागरिक त्यावेळी बोलत होते आणि आजही बोलत आहेत. हा गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार 13 हजार 379 मते मिळून 1991 मतांनी विजयी झाला होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीचे गट व गण रचना अद्याप तयार झाली नाही. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र लढतील का? त्यांची युती न झाल्यास तीनही पक्षांचे उमेदवार उभे राहून उमेदवार वाढतील का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यासोबतच भाजप, रासप, रयत शेतकरी संघटना एकत्र येऊन मैदान उतरतील असे चित्र सध्या कार्यकत्र्यांच्या चर्चेतून दिसत आहे.

हे पक्ष एकत्र येत ही निवडणूक लढणार असल्याचे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी इच्छुकांची संख्या या वेळी वाढणार आहे. आर्थिक पाठबळावर लढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. उमेदवार किती लोकांच्या संपर्कात आहे, त्याचा जिल्हा परिषद गटात किती संपर्क आहे, त्याने नागरिकांची काय कामे केली आहेत, संकटात कोणाला मदत केली आहे हे सर्व पाहून मतदार त्यांना मते देणार आहेत, हे मतदारांच्या चर्चेवरून दिसून येत आहे.

निवडणूक लांब; इच्छुक कामाला

जिल्हा परिषद ही मिनी विधानसभा समजली जात असल्याने आपले अस्तित्व टिकविण्यासाठी उमेदवार कोणता द्यायचा, त्याचा लोकसंपर्क, निवडून येण्याची क्षमता हे पक्षश्रेष्ठी पाहतीलच. निवडणूक अद्याप लांब असली तरी इच्छुक मात्र आतापासून जोरदारपणे कामाला लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news