विमान तिकिटाच्या बहाण्याने 1 लाख 35 हजार रुपयांना गंडवले

विमान तिकिटाच्या बहाण्याने 1 लाख 35 हजार रुपयांना गंडवले
Published on
Updated on

पुणे : विमानप्रवासाचे तिकीट देण्याच्या बहाण्याने 1 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, उंड्री येथील 57 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार हृषीकेश सुधाकर शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेला जायचे होते. त्यासाठी त्यांनी शिंदे याच्याकडे विमान प्रवासाची तिकिटे बुक केली होती. शिंदे याला फिर्यादींनी 1 लाख 35 हजार रुपये दिले होते. सुरुवातीला शिंदे याने त्यांना चुकीचे विमान तिकीट दिले. हा प्रकार फिर्यादींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला जाब विचारला असता, पुन्हा त्याने केवळ तेथे जाण्याचे तिकीट दिले. फिर्यादी या पर्यटन व्हिसावर जाणार होत्या. त्यामुळे त्यांना जाण्याचे व परतीचे ही दोन्ही तिकीट एकाचवेळी बरोबर असणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आरोपीने त्यांची फसवणूक केली.

https://youtu.be/YepUS0JEz38

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news