लोणावळा : कुसगाव बुद्रुक येथील साठेवस्ती येथे गोठ्यातील प्राण्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एका विक्षिप्त तरुणाला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीचा जनावारांचा गोठा असून, मंगळवारी एक जूनच्या पहाटेच्या सुमारास विक्षिप्त तरुणाने फिर्यादीच्या गोठ्यात प्रवेश करून प्राण्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.
या फिर्यादीनुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश माने हे करीत आहेत.
https://youtu.be/YepUS0JEz38