पिंपळगाव जोगा धरण मायनसमध्ये; कुकडी प्रकल्पात मात्र पुरेसा साठा उपलब्ध | पुढारी

पिंपळगाव जोगा धरण मायनसमध्ये; कुकडी प्रकल्पात मात्र पुरेसा साठा उपलब्ध

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा

कुकडी प्रकल्पांतर्गत धरण शृंखलेमध्ये रविवार (दि. 29) अखेर 9.10 टक्के (2.7 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता. पिंपळगाव जोगा धरणात मात्र वजा पाणीसाठा आहे. हवामान खात्याने येत्या काही आठवड्यांत पावसाच्या आगमनाची शक्यता वर्तविली आहे. जलसंपदा विभागाच्या काटेकोर नियोजनामुळे प्रकल्प क्षेत्रात सर्वत्र पाणी उपलब्ध झाल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

या प्रकल्पातील जुन्नर शहर व परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या माणिकडोह धरणात 7.90 टक्के (0.81 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, या धरणांतील भिंतीमधून पाण्याची गळती सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने संबंधित विभागाकडे दिला असून, ही गळती बांधकामातून होत असल्याचे सांगितले जात आहे.

पाणीसाठा कमी झाल्यावर पाणबुड्यांच्या मदतीने ही दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर होणे गरजेचे असल्याचे मत उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी व्यक्त केले आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणांमधील आजअखेरचा उपयुक्त पाणीसाठा पुढीलप्रमाणे : (टीएमसी / टक्केवारी)
डिंभे-                   1.07 / 8.59 %
माणिकडोह –        0.80 / 7.90 %
पिंपळगाव जोगे –  -0.03 / -7.91 %
वडज –                0.13/ 11.74 %
येडगाव –               0.68 / 35.26%

Back to top button