सहकार आयुक्तालयातंर्गत बदल्या: पतसंस्था अपर निबंधकपदी मुकणे तर साखर संचालकपदी गिरी

सहकार आयुक्तालयातंर्गत बदल्या: पतसंस्था अपर निबंधकपदी मुकणे तर साखर संचालकपदी गिरी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सहकार आयुक्तालयातंर्गत कार्यरत आणि अन्य विभागात प्रति नियुक्तीवर कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे महत्वपूर्ण आदेश गुरुवारी 26 मे रोजी शासनाने जारी केले आहेत. साखर संचालकपदी (अर्थ) यशवंत गिरी यांची तर तेथील ज्ञानदेव मुकणे यांची सहकार आयुक्तालयातील अपर निबंधकपदी (पतसंस्था) बदली करण्यात आली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवपदी डॉ. पांडुरंग खंडागळे यांची बदली झाली आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सहकार विभागाचे अपर निबंधक असलेले आर.एम. भुसारी यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त असलेल्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भुसारी यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक (तपासणी व निवडणूक) एन.पी. यगलेवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक (पतसंस्था) डॉ. पांडुरंग खंडागळे यांची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तेथील वाय.पी. गिरी यांची बदली साखर आयुक्तालयातील संचालक (अर्थ) या पदावर बदली झाली आहे. तर सध्याचे साखर संचालक (अर्थ) डी.बी. मुकणे यांची डॉ. खंडागळे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या अपर निबंधक (पतसंस्था) या सहकार आयुक्तालयातील महत्वपूर्ण पदावर बदली झाली आहे. पुणे विभागीय सहनिबंधक संगिता डोंगरे यांची नवी मुंबईत सिडको येथील सहनिबंधक पदावर बदली झाली आहे. तेथील सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांची बदली कोल्हापूर विभागीय सहनिबंधक येथील रिक्त पदावर करण्यात आली आहे.

आकरे, शिंदे यांच्यावर नावांवर पुन्हा शिक्कामोर्तब

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले सहकारचे सहनिबंधक मिलींद आकरे यांनी या पदावर चार वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला आहे. शासनाने त्यांना यापुर्वी विशेष बाब म्हणूनही मुदतवाढ दिलेली होती. ते पदोन्नतीच्या विचार क्षेत्रात असल्याने सध्याच्या पदावर तूर्त मुदतवाढीचे आदेशही शासनाने काढले आहेत. अशीच काहीशी स्थिती राज्य कृषि पणन मंडळाचे सरव्यवस्थापक आणि सहकारचे सहनिबंधक दिपक शिंदे यांच्याबाबतही झालेली आहे. त्यांच्याकडे महत्वपूर्ण मॅग्नेट प्रकल्पाची जबाबदारीही आहे. त्यांना सध्याच्याच पदावर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यापुर्वीही त्यांना विशेष बाब पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली होती. यानिमित्ताने या दोन्ही बदल्यांबाबत सहकार विभागात अधिक चर्चा सुरु झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news