Monsoon Season | यंदाचा मान्सून ८० वर्षांतील सर्वात १० कमकुवतपैकी एक

देशभरात पावसाची तूट सरासरी १२ टक्के
Monsoon Season |
Monsoon Season |Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे : यंदाचा मान्सून हा गत ८० वर्षांतील सर्वात १० कमकुवत मान्सूनपैकी एक गणला गेला आहे. यापूर्वी अलीकडच्या काळात २००९ आणि २०१५ चा मान्सून कमकुवत होता. यंदा देशातील ९९ टक्के राज्यांत कमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघालयात तब्बल ६० टक्के तूट नोंदली गेली आहे. देशाची सरासरी ८६८.६ मि.मी. आहे. यंदा मात्र ७४९.२ म्हणजे १२ टक्के कमी पडला.

देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली. त्यानंतर १० मान्सूनचे हंगाम कमकुवत ठरले आहेत. यंदाच्या मान्सूनने त्या १० मध्ये स्थान पटकावले आहे. गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व, ईशान्य, मध्य आणि उत्तर भारतातील काही भागांत सर्वदूर पाऊस पडला. यामुळे चार-पाच दिवसांच्या कालावधीत हंगामातील पावसाची तूट १५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत खाली आली. तरीही, २०१५ नंतरचा हा भारतातील पहिलाच अपुरा पाऊस असलेला मान्सून हंगाम ठरला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या १० सर्वात कमकुवत मान्सूनपैकी एक म्हणून याचे वर्णन शास्त्रज्ञांनी केले आहे.

स्वातंत्र्यानंतरचे १० कमकुवत मान्सून

* १९५१ : स्वातंत्र्यानंतरचा पहिला मोठा कमकुवत मान्सून.

* १९६५ : देशव्यापी तीव्र दुष्काळ, अन्‍नधान्य टंचाईचे वर्ष.

* १९६६ : सलग दुसऱ्या वर्षी मान्सून अत्यंत कमकुवत

* १९७२ : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा तब्बल २४ टक्‍के कमी. सर्वात गंभीर मान्सून.

* १९८२ : ‘अल निनो’मुळे मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावला आणि सरासरीपेक्षा १४ टक्‍के कमी पाऊस झाला.

* १९८७ : अत्यंत भीषण टंचाई, ज्याचा देशातील ६० टक्‍के शेती क्षेत्राला फटका बसला होता.

* २००२ : जुलै महिन्यात पावसाने पूर्ण ओढ दिल्यामुळे सरासरीपेक्षा १९ टक्‍के कमी पाऊस झाला.

* २००९ आणि २०१५ : २१ व्या शतकातील सर्वात कमकुवत मान्सून पाऊस २२ टक्‍के कमी झाला होता.

* २०२६ (चालू वर्ष) : ‘अल निनो’च्या प्रदीर्घ प्रभावामुळे सर्वाधिक कमकुवत ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news