Pune News: काळ आला होता पण वेळ नाही! चाळीस फूट उंचीवरून पडूनही चिमुरडी बचावली

’आयसीयू’त 16 दिवस उपचार : शस्त्रक्रिया न करताही प्राण वाचविण्यात यश
Pune News
काळ आला होता पण वेळ नाही! चाळीस फूट उंचीवरून पडूनही चिमुरडी बचावलीfile photo
Published on
Updated on

Girl survives 40-foot fall

पुणे: पुण्यातील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून पडून सावी (नाव बदलले आहे) ही दोन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. रेलिंगजवळ खेळत असताना तिचा तोल गेला आणि ती सुमारे 40 फूट खाली पडली. तिच्या मेंदूला अनेक जखमा झाल्याचे तपासणीत दिसून आले. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया न करता औषधे, ऑक्सिजन सपोर्ट आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह केअरद्वारे तिचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. (Latest Pune News)

रुग्णालयात आल्यावर सावी अर्धवट शुद्धीत होती. तिला श्वास घेणेही कठीण झाले होते. डॉक्टरांनी तिला तत्काळ व्हेंटिलेटरवर घेतले आणि रात्रभर मेहनत घेऊन तिला स्थिर केले. स्कॅनमध्ये रक्तस्राव, सूज आणि प्रचंड दाबामुळे मेंदूचे भाग एका बाजूला सरकले होते. दबावामुळे तिच्या मेंदूच्या ऊती जागेवरून ढकलल्या गेल्या होत्या. इतकी गंभीर स्थिती असूनही डॉक्टरांनी तिला तातडीचे उपचार दिले.

Pune News
Balewadi Velodrome: बालेवाडीतील वेलोड्रम येणार ‘ट्रॅक’वर; क्रीडा विभागाकडून काम सुरू

सूर्या रुग्णालयाचे नवजात आणि बाल अतिदक्षता विभागाचे संचालक डॉ. सचिन शहा यांनी सल्लागार आणि बालरोग न्यूरोसर्जन डॉ. राकेश रंजन यांच्याशी चर्चा करून पुढील उपचारांचा निर्णय घेतला.

सावीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या मेंदूला अनेक जखमा झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूला सूज येऊन तंतू फाटले होते. हे कितीही गंभीर दिसत असले तरी, स्कॅनमध्ये समोर आलेल्या बाबींवरून त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही, असे आमचे मत बनले. अशा लहान मुलांमध्ये रक्तस्राव वाढत नसेल, तर शस्त्रक्रियेमुळे कधी कधी फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते, अशी माहिती डॉ. सचिन शहा यांनी दिली.

Pune News
Shravan Somvar Special: शिवलिंगासारखा आकार असलेली टेकडी

पाचव्या दिवशी सावीची प्रकृती थोडी स्थिर वाटत असतानाच अचानक ती अविरत फिट्स येण्याच्या स्थितीत गेली. ही अवस्था ‘रिफ्रॅक्टरी स्टेटस एपिलेप्टिकस’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे वेळेत उपचार न झाल्यास ही अवस्था प्राणघातक ठरते. या अवस्थेत त्वरित प्रतिक्रिया न दिल्यास मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. आम्ही उपचारांची पद्धत बदलली आणि तिला गाढ झोपेत ठेवून मेंदूवरचा दाब कमी केला. हा निर्णय निर्णायक ठरला.

- डॉ. राकेश रंजन, बाल न्यूरोसर्जन

सावी पडली तेव्हा लगेच बेशुद्ध झाली नाही. ती थरथर कापू लागली आणि तिला उलटीही झाली. ती माझ्या हातात अक्षरश: थरथरत होती; हे द़ृश्य सुन्न करणारे होते. आयसीयूमधील 16 दिवस आमच्यासाठी एका युगासारखेच होते. मात्र, देव आणि डॉक्टरांमुळे आमची लेक परत आली.

- सावीची आई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news