पुण्यात भिंत कोसळून 5 कामगार दबले; 2 ठार

पुण्यात भिंत कोसळून 5 कामगार दबले; 2 ठार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील आयटीडब्ल्यू कंपनीसमोर असलेली 15 फूट उंचीची भिंत कोसळून भिंतीशेजारी उभ्या असलेल्या एका कामगाराचा जागीच, तर दुसर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक मिळाली असून, तेथे उभ्या असलेल्या 1 चारचाकी, 1 बस, 9 दुचाकी व 2 सायकलींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मृत्युमुखी पडलेल्यांची नावे राजीव कुमार व मंजित कुमार अशी असून, बंडू विधाटे, विजय गायकवाड आणि सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बुधवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

काही कामगार दुचाकींजवळ असताना अचानकपणे कंपनीसमोरील सुरक्षा भिंत कोसळली. पाच कामगार भिंतीखाली दबले गेले. काही कामगारांनी त्यांना बाहेर काढले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस हवालदार आत्माराम तळोले, प्रतिक जगताप आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. परंतु उपचारापूर्वी राजीव कुमार यांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान मंजीत कुमार याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 9 दुचाकी गाड्या, दोन सायकली व 1 बोलेरो (एमएच 12 युएम 3793) व 1 एक टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच 14 सीडब्ल्यू 4440) यांचे नुकसान झाले.

मुलाखतीसाठी आले अन्…

डिंग्रजवाडी (ता. शिरुर) येथील आयटीडब्ल्यू प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कामगार कामावर आलेले होते, तर काही कामगार कंपनीत कामासाठी आयोजित मुलाखतीसाठी आलेले होते. कामगारांनी त्यांच्या दुचाकी तसेच कामगारांची वाहतूक करणारी बस व कार कंपनीसमोरील मोकळ्या जागेत लावलेल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news