जिल्हा बँकेच्या परीक्षेची प्रतीक्षा; रिक्त जागा 356, उमेदवारांकडून अर्ज आले 31 हजार | पुढारी

जिल्हा बँकेच्या परीक्षेची प्रतीक्षा; रिक्त जागा 356, उमेदवारांकडून अर्ज आले 31 हजार

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये रिक्त जागा 800 नसून 356 आहेत. त्याबाबतच्या लिपिकभरती प्रक्रियेची जाहिरात यापूर्वीच बँकेकडून जुन्या संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये प्रसिध्द झालेली आहे. त्यासाठी सुमारे 31 हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत. या परीक्षेची उमेदवारांना प्रतीक्षा लागली आहे.

जिल्हा बँकेच्या (पीडीसीसी) कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील शाखा स्थलांतर कार्यक्रमामध्ये बँकेचे संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रिक्त जागांची भरती करण्याची घोषणा रविवारी (दि. 22) केली होती. त्यावर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर हा विषय चर्चेचा झाला होता. त्यावर ही माहिती मिळाली.

कोरोना साथीमुळे मागील अडीच वर्षे बँकेमध्ये अधिकार्‍यांची पदोन्नती रखडलेली आहे. त्यावरही संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे. पदोन्नतीस पात्र अधिकार्‍यांची संख्या जवळपास 400 असून, जागांचा आकडा सुमारे आठशेच्या आसपास जात असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात बँकेकडून यापूर्वीच प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार 356 जागाच भरल्या जाणे अपेक्षित असल्याच्या माहितीस बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दुजोरा दिला.

जल्हा बँक कर्मचारी स्थिती

जिल्हा बँकेच्या एकूण शाखा 294
त्यापैकी शहरांतर्गत शाखा 40
कार्यरत कर्मचार्‍यांची संख्या 1223
रिक्त जागा (लिपीक) 356

हेही वाचा :

Back to top button