पुणे : वर्षभरात 55 हजार बालकांना नियमित लस | पुढारी

पुणे : वर्षभरात 55 हजार बालकांना नियमित लस

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मागील वर्षभरात 0 ते 9 महिने वयोगटांतील मुलांचे एकूण उद्दिष्टांपैकी 91 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. कोरोनाचा अडथळा असतानाही महापालिकेच्या लसीकरण विभागाने ही कामगिरी बजावली आहे.

१ हजार नव्‍हे ३ हजार कोटींचा घोटाळा, आशिष शेलारांकडून भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुन्‍हा आरोप

जन्मापासून 9 महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने बालकांना बीसीजी, पेंटा, रूबेला, न्युमोकोकल अशा प्रकारचे लसीकरण करण्यात येते. शहरामध्ये दरवर्षी 60 हजार 900 बालकांना लस देण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात येते. यामध्ये गर्भवती महिलांची झालेली नोंद, प्रसूतींची संख्या, दुसर्‍या जिल्ह्यातून पुण्यात येणार्‍यांची संख्या यावरून हे उद्दिष्ट ठरवले जाते.
गेल्यावर्षी एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत 60 हजार 900 बालकांपैकी 55 हजार 568 बालकांचे लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण 91 टक्के इतके आहे.

महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट; संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

कोरोनाच्या काळात अनेक नागरिक गावाला गेले. काही मध्येच सोडून गेले. कोरोनामुळे अनेकांनी लसीकरण केले नाही, अशा परिस्थितही 91 टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले, ही मोठी कामगिरी असल्याची माहिती पालिकेच्या लसीकरण विभागाकडून देण्यात आली.

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीच्या द कश्मीर फाईल्सवर सिंगापूरमध्ये बंदी

कोरोनाचा काळ असतानाही गेल्या तीन वर्षांत महापालिकेकडून दरवर्षी 90 टक्क्यांच्या पुढेच बालकांचे लसीकरण झालेले आहे. यामध्ये काही गर्भवती या इतर जिल्ह्यांतून आपल्या जिल्ह्यात म्हणजेच माहेरी प्रसूतीसाठी येतात, त्या 9 महिने होईपर्यंत थांबत नाहीत आणि त्यामुळे काही डोस राहतात. ते इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन घेतले जातात. यामुळे आपल्याकडील लसीकरणाची टक्केवारी घटते. तरीही पुणे महापालिकेने कोरोना असतानाही उत्तम कामगिरी केली आहे.

– डॉ. सूर्यकांत देवकर, मुख्य लसीकरण अधिकारी, पुणे मनपा

Back to top button