अबब…किरकोळ बाजारात एक लिंबू तब्बल 15 रुपयांना! | पुढारी

अबब...किरकोळ बाजारात एक लिंबू तब्बल 15 रुपयांना!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आंबट चवीच्या लिंबाला विक्रमी दर मिळत असल्याने राज्यातील शेतकरी वर्गाकडून लहान तसेच कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे. रसाचे प्रमाण कमी तसेच प्रतवारी घसरलेल्या स्थानिक लिंबाची खरेदी करण्याकडे पुणेकरांनी पाठ फिरविली आहे, तर याउलट रसदार हैदराबादी, चेन्नईच्या लिंबाच्या खरेदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे. या लिंबांना प्रति नग तब्बल १० ते १५ रुपये भाव मिळत आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण : मध्‍य प्रदेशमधील पंचायत निवडणुकांची अधिसूचना दोन आठवड्यात काढा : सर्वोच्‍च न्‍यायालय

बाजारात महाराष्ट्रातून नगर, सोलापूर येथून स्थानिक लिंबाची आवक होत आहे, तर परराज्यातून हैदराबादपाठोपाठ आता चेन्नई येथून लिंबांची आवक सुरू आहे. सद्य:स्थितीत बाजारात दररोज 700 ते 1200 गोण्यांची आवक होते. एरवी हीच आवक दोन ते 3 हजार गोण्यांची होत असते. घाऊक बाजारात लिंबाच्या 15 किलोंच्या एका गोणीस प्रतवारीनुसार 600 ते 2000 रुपये दर मिळत आहे, तर किरकोळ बाजारात एका नगाची दहा ते पंधरा रुपयांना विक्री केली जात आहे.

उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय, योगी सरकारचा मोठा निर्णय

दोन आठवड्यांपुर्वी लिंबांच्या गोणीचे कमीत कमी भाव 1500 रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, लिंबाच्या बागांना पाणी कमी पडत असल्याने स्थानिक लिंबाची आवक घटली आहे. बाजारात येणार्‍या स्थानिक लिंबामध्ये हिरव्या आणि खराब प्रतीच्या लिंबाचे प्रमाण अधिक असल्याने गोणीचे भाव सहाशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत हिंसाचाराचा आगडोंब; संतप्‍त जमावाने १२ मंत्र्यांची घरे दिली पेटवून, भारतीयांसाठी हेल्‍पलाईन जारी

स्थानिक लिंबाच्या तुलनेत हैदराबाद आणि चेन्नई येथून आलेल्या लिंबांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे या लिंबांना सरबत विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, उसाचे गुर्‍हाळ आणि घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हैदराबाद व चेन्नई येथून बाजारात दाखल होणार्‍या लिंबाला मागणी चांगली असून, त्याला दरही चांगले मिळत आहे.

– रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी

Back to top button