पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शहरातील मोटार वाहन कर न भरलेल्या तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या 18 वाहनांचा जाहीर ई-लिलाव 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. ई-लिलाव होणार्या वाहनांमध्ये बस, एचजीव्ही, एक्सकॅव्हेटर, एलजीव्ही, टुरिस्ट टॅक्सी, रिक्षा आदी वाहनांचा समावेश आहे.
या ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधी-ुुु.शर्रीलींळेप.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर नाव नोंदवता येणार आहे. वाहनांच्या निरीक्षणाची व पसंतीची संपूर्ण जबाबदारी वाहन विकत घेणार्याची असेल. त्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या आवारात शुक्रवार (दि. 18) ते मंगळवार (दि. 6) या कालावधीत लिलाव होणारी वाहने कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.
ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नावनोंदणी झाल्यानंतर 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत उपप्रादेशिक कार्यालयातील पिंपरी चिंचवड खटला विभागात 50 हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट डीवाय आरटीओ पिंपरी चिंचवड या नावे सादर करायचा आहे.
टाटा सुमो टॅॅक्सी, ओमनी टॅक्सी, एक्सकॅव्हेटर, ईको कॅब, ट्रक, इंडिया कॅब, सुमो, दोन ऑटो रिक्षा, पाच बस एलजीव्ही आदी गाड्यांचा लिलाव होणार आहे.