

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आळंदी येथील सिद्धटेक बेटाची स्वच्छता मोहीम स्वराज्य संघ यांच्या वतीने करण्यात आली. या वेळी गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिक रॅपर, एक बॅग भरून दारूच्या बाटल्या आणि अन्य 18 बॅगा प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांनी दिली. अनेकांनी सोशल मीडियावर सिद्धटेक बेटामध्ये अस्वच्छता निर्माण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. परंतु, सिद्धटेक बेट स्वच्छ करण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.
प्रत्येक जण प्रशासनाकडे बोट दाखवून निघून जात होता. स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहणी केली. स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांच्याशी स्वच्छतेबाबत चर्चा केली. त्यानंतर स्वराज्य संघाच्या माध्यमातून सिद्धटेक बेट स्वच्छ करण्याची मोहीम स्वराज्य संघाच्या माध्यमातून करण्यात आली.
तेथे अनेक गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिक रॅपर, एक बॅग भरून दारूच्या बाटल्या आणि अन्य 18 बॅगा प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेमध्ये स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन कारले, संतोष टाकळकर, खेड तालुका उपाध्यक्ष संतोष टाकळकर, अमोल बोंबले, खेड तालुका महिलाध्यक्षा प्रतिभा पवार, ऊर्मिला गवारे, राधा बोघाडे, जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब ढेरंगे, शिरूर तालुकाध्यक्ष विशाल दिघे, शिरूर तालुका संपर्कप्रमुख विश्वास घाडगे, स्वराज्य संघाचे शेतकरी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष वनाजी बांगर, नवनाथ बांगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. स्वराज्य संघाचे खेड तालुकाध्यक्ष रोहिदास महाराज मांजरे आणि स्वराज्य संघाचे सचिव श्यामकांत निघोट यांनी ही माहिती दिली.