पुणे : ओमनी गाडीमध्ये एलपीजी गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट | पुढारी

पुणे : ओमनी गाडीमध्ये एलपीजी गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट

नारायणपुर (पुणे), पुढारी वृत्तसेवा : सासवडच्या दळवी आळी (ता. पुरंदर) येथे ओमनी गाडीमध्ये एलपीजी गॅस भरताना अचानक पेट घेतला. यामध्ये एक जण जखमी झाला. यावेळी शेजारील एका दुचाकीला देखील आग लागली आहे. ही घटना सायंकाळी ५ च्या सुमारास घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सासवड शहरातील दळवी आळी येथे ओमनी गाडी (क्रं. एमएच १२ बीजी २१३३) मध्ये शिवाजी गणपत दळवी (वय ४२ ) हे त्यांच्या घरासमोर गॅस भरत असताना गाडीने पेट घेतला. यानंतर त्या ज्वालाग्रही गॅसमुळे शेजारील दुचाकीला व शेजारील घराच्या दरवाजा त्याचबरोबर घराच्या खिडक्याच्या काचा फुटल्या, तर आग लागून गाडीचे नुकसान झाले आहे. ही आग परिसरातील नागरिकांनी बोरवेअलच्या पाण्याने आटोक्यात आणली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सासवडचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button