

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : रानमेवा म्हणून ओळखली जाणारी डोंगराची काळी मैना करवंद बाजारात दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोकणातून आवक सुरू झाली आहे. सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने मुले काळी मैना खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
फळ बाजारात गेल्या काही दिवसांपासून कोकणातून करवंदाची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. सावंतवाडी, महाड, रत्नागिरी, कणकवली परिसरातून करवंद बाजारात येत आहेत.
शहरातील बाजारात मोजक्याच व्यापार्यांकडे करवंद उपलब्ध आहेत. येत्या काळात आवक वाढल्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात करंवद विक्रीसाठी उपलब्ध होतील, असे व्यापार्यांनी सांगितले.
शहतराील टोल नाके व सिग्नलवर 15 ते 20 रुपये वाट्याने करवंद मिळत आहेत. चवीला तुरट गोड, लहान करवंद लक्ष देधून घेत आहेत.
मे महिन्याच्या मध्यवर्तीमध्ये करवंदसोबत जांभूळ आणि इतर कोकण मेव्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रान मेवा विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे व्यापारी सांगतात.