पिंपरी : पालिका शहरात उभारणार जिजाऊ क्लिनिक | पुढारी

पिंपरी : पालिका शहरात उभारणार जिजाऊ क्लिनिक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी रुग्णांना उपचार सेवा व सुविधा पुरविण्यासाठी जिजाऊ क्लिनिक (प्राथमिक उपचार केंद्र) सुरू करण्यात येणार आहेत.

त्यासाठी आवश्यक संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि. 4) मंजुरी दिली.

शहरातील दाट लोकवस्तीच्या भागामध्ये पालिकेच्या वतीने जिजाऊ क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. त्यांची घोषणा सन 2022-23 च्या अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळेस करण्यात आली होती.

Shivani Wed : लग्नमंडपाच्या तयारीपासून अक्षता पडेपर्यंतचा स्पेशल व्हिडिओ

सद्यस्थितीत पालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासह आकुर्डी, जिजामाता, थेरगाव, भोसरी असे अद्यावत सुसज्ज रुग्णालय सुरू आहे. तसेच, तालेरा, यमुनानगर, सांगवी रुग्णालयासह 27 दवाखाने विविध भागात आहेत.

ज्या भागात 1 किलोमीटर अंतरात पालिकेचे रुग्णालय किंवा दवाखाने नाहीत, अशा ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी रुग्णांची तपासणी व आवश्यक औषधे उपलब्ध करुन दिले जातील. प्राथमिक उपचार सुरु झाल्यामुळे पालिका रुग्णालय व दवाखान्यांवर पडणारा ताण कमी होणार आहे.

क्लिनिकमार्फंत रुग्ण सेवेबरोबर शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत. आठ हजार ते दहा हजार वस्ती असलेला भाग, झोपडपट्टी भाग, जास्त मनुष्यवस्ती असलेल्या चाळी किंवा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत.

आयपीएलच्या ‘मांडवात’, ‘ती’ म्हणाली माझा होशील का? (Video)

ही सेवा सुरू करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक होती. आयुक्त पाटील यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कनिष्ठ अभियंत्यांच्या भरती करण्यास मान्यता स्थापत्य विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांची भरती नामनिर्देशनाचे 75 टक्के आणि पदोन्नतीने 25 टक्के असे प्रमाण करण्यास विधी समितीची मान्यता आवश्यक होत या विषयास आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली.

19 कोटी 68 लाख खर्चांच्या विषयांना आयुक्तांनी मंजुरी पशुवैद्यकीय विभागाकडील सन 2022-23 च्या अर्थसंकल्पातील विभागाअंतर्गत तरतूदीमध्ये 50 लाख वाढ व घट करणे,

पिंपळे गुरव परिसरातील ड्रेनेजलाइनची देखभाल व दुरुस्तीची कामे करणे, ई क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील क्रीडा विषयक स्थापत्याची कामे करणे, प्रभाग क्रमांक 8 मध्ये नवीन जीआय विद्युत खांब, हायमास्ट व विद्युत विषयक कामे करणे,

पुणे : गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणी ६ जणांना दुहेरी जन्मठेप

ज्येष्ठ नागरिक संघासाठी टीव्ही संच खरेदी करणे, पीएमपीएमएलला संचलन तूट रक्कमेपोटी 16 कोटी रुपये अदा करणे, विविध कामांसाठी विभागामधील लेखाशिर्षामधून तरतूद वर्गीकरण करणे आदी सुमारे 19 कोटी 68 लाख 85 हजार रुपये खर्चांच्या विषयांना आयुक्तांनी मंजुरी दिली.

अग्निशमन विभागाकडील क्वीक रिसपॉन्स व्हेईकल (देवदूत) या वाहनाची देखभाल दुरुस्ती, चलन ववलन करण्याकामी नवीन लेखाशिर्षावर तयार करण्यास व बिले खर्ची टाकण्यास मान्यता देण्यात आली.

 

Back to top button