कार्ला : पुढारी वृत्तसेवा : येथील शेतकर्यांच्या शेतीतील माती परिक्षण केले जाणार असून यासाठी होणारा खर्च ग्रामपंचायत करणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कार्ला गावातील शेतकर्यांसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने शेतकरी मार्गदर्शनपर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शेतामध्ये खतांचा वापर कसा करावा, बी बियाणे कशी लावावी तसेच जमीनीतील मातीचे नमूने कसे तपासले जातात व त्याचा शेतीसाठी काय फायदा होतो याची माहिती कृषी सहायक प्रतिक हंडाळ, अंकुश पारधी, दत्तात्रय घोगरे यांनी दिली.
या वेळी सरपंच दीपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, सदस्य सागर जाधव, सचिन हुलावळे, सनी हुलावळे यांंच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
https://youtu.be/uRpprmHUGnM