पिंपरी : उद्यान देखभालीसाठी पावणेदोन कोटींचा खर्च | पुढारी

पिंपरी : उद्यान देखभालीसाठी पावणेदोन कोटींचा खर्च

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची शहरात असंख्य सार्वजनिक उद्याने आहेत. ती उद्याने तसेच रस्ते व वृक्ष देखभाल करण्याच्या कामासाठी मजूर पुरविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय निविदा काढण्यात आली होती.

दीड वर्षाच्या या कामासाठी 1 कोटी 72 लाख खर्च आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. 26) मंजुरी दिली.

संजय राऊत बंटी बबली, ४२० म्हणतात, नवनीत राणांची जेलमधून डायरेक्ट दिल्ली पोलीसांत तक्रार !

उद्यान, रस्ते व वृक्षाची देखभाल करण्यासाठी मजूर पुरविण्यासाठी उद्यान विभागाने क्षेत्रीय कार्यालयानिहाय निविदा काढली होती. त्यासाठी चार वेगवेगळ्या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

त्यात अ क्षेत्रीय कार्यालयासाठी अथर्व स्वयंरोजगार औद्योगिक सेवा सहकारी संस्थेची 2.87 टक्के कमी असलेली 21 लाख 48 हजार 255 दराची निविदा पात्र ठरली. तसेच, फ क्षेत्रीय कार्यालयासाठी याच संस्थेची 2.16 टक्के कमी असलेली 21 लाख 63 हजार 959 दराची निविदा मंजूर झाली.

खिलाडूवृत्तीला सुरुंग!, हर्षलने परागशी हात मिळवण्यास दिला नकार

ब क्षेत्रीय कार्यालयासाठी अर्जुन आधार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची 2 टक्के कमी असलेली 21 लाख 67 हजार 497 दराची निविदा पात्र ठरली.

क क्षेत्रीय कार्यालयासाठी श्रमिक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची 3.59 टक्के कमी असलेली 21 लाख 32 हजार 330 दराची निविदा मंजूर करण्यात आली. त्याच संस्थेला 21 लाख 34 हजार 321 दराची ई क्षेत्रीय कार्यालय आणि 21 लाख 48 हजार 255 दराची ग क्षेत्रीय कार्यालयाची निविदाही मंजूर करण्यात आली आहे.

हिंदुस्थानला गांधी बाधा झालेली आहे; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची ड क्षेत्रीय कार्यालयासाठी 2.87 टक्के कमी दराची 21 लाख 48 लाख 255 रक्कमेची आणि ह क्षेत्रीय कार्यालयासाठी 2.87 कमी दराची 21 लाख 48 हजार 255 रक्कमेची निविदा पात्र ठरली आहे.

Back to top button