वडगाव मावळ : सात वर्षीय स्वरालीने सर केला तैलबैल कडा

तैलबैल सुळका सर करणारी वडगाव मावळ येथील 7 वर्षीय स्वराली शशिकांत गराडे.
तैलबैल सुळका सर करणारी वडगाव मावळ येथील 7 वर्षीय स्वराली शशिकांत गराडे.

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : सुमारे 3322 फूट उंच असणार्‍या तैलबैल कडा सर करून वडगाव मावळ येथील स्वराली शशिकांत गराडे या 7 वर्षांच्या चिमुरडीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली.

सह्याद्री एडवेंचरच्या खेळाडूंनी नुकतीच तैलबैल सुळका आरोहन मोहीम आयोजित केली होती. दोन कातळ भिंतीमुळे हा कडा लक्ष वेधून घेतो. या भिंतीच्या मध्यावर इंग्रजी व्ही आकाराची खाच आहे.

यामुळे या भिंतीचे 2 भाग झालेले आहेत. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.

असा हा कडा शशी गराडे, रवी दराडे, ओम पाटील, राजेंद्र दराडे यांच्या मदतीने 10 वर्षीय यश दराडे, 72 वर्षीय केशव दराडे यांच्यासह स्वराली गराडे या 7 वर्षीय चिमुरडीने सर केला व भगवा झेंडा फडकवून अभिवादन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news