पिंपरी : ‘प्लॉगेथॉन’द्वारे 20 टन कचर्‍याचे संकलन | पुढारी

पिंपरी : ‘प्लॉगेथॉन’द्वारे 20 टन कचर्‍याचे संकलन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात आली. त्यात एकूण 20 टन कचरा संकलित करण्यात आला.

हज यात्रेसाठी २२ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात प्लॉगेथॉन मोहिम गुरूवारी (दि.14) राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य व नागरिक सहभागी झाले होते.

कोल्हापूर : येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत, तेव्हा बघू : सत्यजित कदम

एकूण 2 हजार 781 जणांनी कचरा संकलन व जनजागृतीमध्ये सहभाग घेतला. त्यात 20 टन कचरा गोळा करण्यात आला. तो कचरा मोशी कचरा डेपोत येथे पाठविण्यात आला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, नाना कदम लढले, तर फेस आला, मी लढलो असतो तर…

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात महापालिकेकडून विविध ठिकाणी प्लॉगेथॉन मोहिमेचे आयोजन केले जाते. या मोहिमेस नागरिकांच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button