

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. आहार हॉटेलसमोर, स्वामी समर्थ मंदिराजवळ, नाशिक रोड भोसरी येथे शुक्रवार (दि. 8) रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.
मुकुंद पाचारणे (वय 48, रा. कुरळी, खेड) असे अपघातात मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांचा मुलगा तेजस पाचारणे (वय 20) यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून एचआर 47 डी 9149 या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंद पाचारणे हे शुक्रवारी त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 जेटी 6536) पुणे ते कुरळी प्रवास करीत होते.
रात्री नऊ वाजता आहार हॉटेलसमोर, स् वामी समर्थ मंदिराजवळ आल्यावर त्यांच्या दुचाकीला एचआर 47 डी 9149 या क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. यामध्ये पाचारणे यांना दुखापत झाली व त्यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.