इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. 3) 156 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जिजाबा गावडे यांनी दिली.
यामध्ये माजी सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने, आमदार दत्तात्रय भरणे यांचे बंधू व विद्यमान संचालक मधुकर भरणे, माजी सभापती दत्तात्रय फरतडे, संग्रामसिंह निंबाळकर, रोहित मोहोळकर, शिवाजी इजगुडे, सचिन देवकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे नीलेश देवकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, काँग्रेस पक्षाचे काका देवकर, विभीषण लोखंडे, भाट निमगावचे माजी सरपंच मनोहर भोसले, शहाचे उपसरपंच दिलीप पाटील, भांडगावचे सरपंच सुभाष गायकवाड, अमोल बंडगर, हनुमंत काजळे, डिकसळचे सुनील काळे, सोमनाथ भादेकर यांचा समावेश आहे.
18 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये कृषी पतसंस्था सर्वसाधारणमधून 70, कृषी पतसंस्था सर्वसाधारण महिला प्रतिनिधी 11, कृषी पतसंस्था इतर मागास प्रवर्गमधून 8, कृषी पतसंस्था भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून 16, ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून 32, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमातीमधून 5, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक 8, अनुज्ञप्तीधारक व्यापारी व अडते 5, हमाल व तोलारी संघातून 2 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.